Imtiaz Jaleel vs. Sanjay Gaikwad : ‘लुंगी सोडून कानशिलात लगावली असती’ म्हणणारे जलील यांची आज बुलढाण्यात सभा

AIMIM leader holds public meeting in Buldhana : आमदार गायकवाडांच्या गडात थेट एन्ट्री; राजकीय संघर्ष उफाळणार

Buldhana आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन वादानंतर निर्माण झालेल्या राजकीय खळबळीत आता थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील आज, रविवार, दि. २० जुलैला आमदार संजय गायकवाड यांचा गड मानला जाणाऱ्या बुलढाण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत वादग्रस्त प्रकार घडला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी “मी त्या वेटरच्या जागी असतो, तर गायकवाडांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती” असे वादग्रस्त विधान करत वातावरण चिघळवले होते.

Akola Municipal Corporation : मालमत्ता कर संकलनासाठी ‘स्थापत्य’कडून अकोला शहरात सर्वेक्षण

यावर आमदार गायकवाड यांनी “हा वेटर आमच्या हॉटेलचा कर्मचारी आहे. फक्त दोनच घुसे मारले. तुम्हाला एवढा मारेल की हॉटेल चालवायच्या लायकीचेही राहणार नाही”, असा परखड प्रतिउत्तर देत जलील यांना थेट भिडण्याचे आव्हान दिले होते.

जलील यांनीदेखील गायकवाडांच्या टोलेबाज भाषेला सडेतोड उत्तर देत, “मला तुमच्याशी वैयक्तिक काही नाही. पण गरीबांवर अन्याय होतोय आणि मुख्यमंत्रीही यावर हसत उत्तर देत असतील, तर मी आवाज उठवणारच. जागा, वेळ तुमची – मी तयार आहे,” अशी रोखठोक भूमिका घेतली.

जलील यांची २० जुलै रोजी संध्याकाळी इक्बाल चौक, बुलढाणा येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर त्यांचा दौरा मोताळा, मलकापूर आणि नांदुरा येथेही होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही सभा केवळ राजकीय भाषणे मर्यादित राहते की गायकवाड आणि जलील यांच्यात थेट सामना होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bacchu Kadu : कर्जमाफीची समिती दिशाभूल करणारी; बच्चू कडूंचा आरोप

राजकीय रंगात रंगलेले हे वादग्रस्त वाकयुद्ध आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार की नाही, हे २० जुलैनंतर स्पष्ट होईल. परंतु बुलढाण्यात सध्या सर्वांचे लक्ष या दोन नेत्यांच्या जाहीर राजकीय भिडतीकडे लागले आहे.