Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची लवकरच भरपाई मिळणार

Statement by Minister Girish Mahajan in the Legislative Assembly : मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Mumbai: नुकत्याच झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पूर्व आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संबंधित नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच नुकसान भरपाई मिळेल असे निवेदन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिले आहे.

विदर्भातील अतिवृष्टि संदर्भात विधानसभेत निवेदन करताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, आठ आणि नऊ जुलै रोजी विदर्भात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यात काही घरांचे अंशतः तर काही घरांचे पूर्णतः नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय विविध मनुष्यहानी आणि काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. या पावसाचा फटका जनावरांनाही बसला आहे तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करणे सुरू आहे.

Chandrashekhar Bawankule : मंत्री, नेत्यांसोबत सगळेच फोटो काढतात, पण..

 

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत त्याचा अहवाल अद्याप शासनाकडे प्राप्त झालेला नाही. घरांची जी काही पडझड झाली आहे, त्या संदर्भात जिल्हा पातळीवर निधी वितरित करण्यात आला आहे. घरातील वस्तू ,भांडीकुंडे, कपडे इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. शिवाय टपरी दुकान यांना शासन निर्णयाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील नियमात मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

Devendra Fadnavis : काही लोक एकही अक्षर न वाचता, जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत!

या निवेदनानंतर विजय वडेट्टीवार यांनी वारंवार येणारा पूर रोखण्यासाठी धरणातील गाळ काढण्या संदर्भात मागणी केली. विदर्भातील धरणांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळेच पूर परिस्थिती कायम होत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यभरातील धरणांचा गाळ काढण्यासंदर्भात आपण एक धोरण ठरवत आहोत या संदर्भातील आलेले प्रस्ताव मी मंजूर केले आहेत. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.