Decisive hearing on the future of course of the protest tomorrow : आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर उद्या निर्णायक सुनावणी
Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन जोर धरत आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले असून, उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर स्पष्टता येणार आहे.
न्यायालयाने आंदोलकांना फक्त आझाद मैदानापुरतेच मर्यादित राहण्याचे आदेश दिले आहेत. पाच हजारांहून अधिक लोक मैदानात जमू नयेत, ही जबाबदारी आयोजकांवर असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. आमरण उपोषणाला परवानगी नव्हती आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी सहानंतर मैदान रिकामे करणे आवश्यक होते, हेही कोर्टाने ठामपणे सांगितले.
दरम्यान, आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी उसळली आहे. आंदोलकांचे रेल्वे स्टेशनवर कबड्डी-खो-खो खेळतानाचे, रस्त्यावर आंघोळ करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे संपूर्ण भाग ठप्प झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Amit Thackeray : मराठा आंदोलनकर्त्यांसाठी अमित ठाकरेचं भावनिक आवाहन
हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनामुळे चार मोठ्या रुग्णालयांची यंत्रणा विस्कळीत झाल्याचे सांगितले. आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरतात, प्रवाशांना अडवतात, गाड्यांचे लायसन्स तपासतात, असे व्हिडिओ त्यांनी कोर्टात दाखवले.
Nitin Gadkari : धर्माच्या नावाखालील राजकारण समाजासाठी घातक !
सदावर्ते यांनी आंदोलनात राजकीय हस्तक्षेपाचाही आरोप केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडून आंदोलकांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवले जात असल्याचे ते म्हणाले. अंतरावलीत पोलिसांवर हल्ला झाला, महिला पोलिसांनाही मारहाण झाली, सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या, असेही त्यांनी निदर्शना आणले.;उद्याची सुनावणी आंदोलनाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता कोर्टाच्या आदेशाकडे लागले आहेत.
____