Minister Dattatray Bharane : दिलेल्या वेळेत पूर्ण होणार Nagpur Sports Hub!

 

Nagpur Sports Hub will be completed within the given time : क्रीडामंत्र्यांचा शब्द; मंत्रालयात झाली आढावा बैठक

Nagpur एरवी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाचे नागपूरकडे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र असते. मात्र क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. नागपूर स्पोर्ट्स हब ठरलेल्या मुदतीत उभारणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मंत्रालयात याबाबत आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते.

मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतिगृह, अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डिंग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्त्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

Project Victims of Amravati : पालकमंत्र्यांनी पुनर्वसित गावांना घ्यावे दत्तक!

त्याचबरोबर ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ची उभारणी विहीत वेळेत करावी. कामाचा दर्जा, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही भरणे यांनी दिले. या बैठकीला क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपअभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तूविशारद नुपूर वैद्य, नम्रता शेट्टी उपस्थित होते.

नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नित कोर्सेससाठी ॲकेडमी सुरू करून त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट्स कोचिंग इत्यादी कोर्सेस सुरू करून खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करिअरची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे.

Navneet Rana : नवनीत राणा हाजीर हो!

स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारून नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहिती दिली जाईल.शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजना, विविध पुरस्कार, शासकीय व खासगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादींबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल असे भरणे यांनी स्पष्ट केले.