Breaking

MLA Sanjay Gaikwad : लातूरला मारका बैल दिला, गायकवाडांवर राजकीय कोटी!

Politics over a bull given to a farmer by Shine Sena leader : आमदाराने दिलेला बैल शेतकऱ्याला जवळच येऊ देत नाही

Buldhana आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासच्या कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच आमदार महोदय आणखी एका विषयामुळे चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी हाडोळती (ता. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार व त्यांच्या पत्नीकडे बैलजोडी नसल्याने दोघेही स्वतः औत ओढतानाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांना हे दृष्य बघवले नाही आणि त्यांनी बैलजोडी देण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर पवार यांच्याकडे बांध्यावर जाऊन बैलजोडी सुपूर्त केली होती.

Collector of Amravati : गरज भासल्यास तडीपारीची कारवाई करू, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितले

गायकवाड यांनी दिलेल्या बैलाला आता नावे ठेवली जात आहेत. पण, त्याचे कारणही गायकवाड हेच आहेत, असे बोलले जात आहे. यातील एक बैल शेतकऱ्याला जवळच येऊ देत नाही. तो ‘मारका’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता गायकवाड यांनी मारका बैल लातूरमध्ये दिला, अशी राजकीय कोटी केली जात आहे.

Nitin Gadkari : गडकरींच्या जनता दरबारात ‘ऑन दि स्पॉट’ निकाल!

यावर काहींनी तर सोनू सूद थोडक्यात बचावला, अशी मिश्किलीही केली आहे. अभिनेता सोनू सूद याने या कुटुंबाला ४५ हजार रुपयांची मदत केली. त्याने ही मदत कुटुंबाच्या खात्यात जमा केली. पण ‘सोनू सूदने बैल न पाठवता पैसेच दिलेत, हे बरे झाले,’ असे गंमतीने बोलले जात आहे. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही पवार यांना बैलजोडी दिल्याची चर्चा आहे.