Hydrabad-Court-Summoned-Navneet-Rana : हैदराबाद न्यायालयाने बजावले समन्स; ओवेसींच्या विरोधातील विधान पोहोचले न्यायालयात
Amravati नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये व कृतीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना हैदराबाद (Hyderabad) येथील शादनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
वादग्रस्त वक्तव्ये व कृतीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून हैदराबाद न्यायालयाने नोटीस बजावली आहे. हैदराबाद लोकसभा निवडणुकीत असददुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हे एमआयएम (MIM) पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भाजपने माधवी लता (Madhavi Latha) यांना रिंगणात उतरविले होते. त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर जोरदार प्रचार केला.
Nagpur Police : पहिले पोलिसांना Lightly घेतले, मग तरुणीची सिट्टी पिट्टी गुम!
त्यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा हैदराबादला गेल्या होत्या. त्यावेळी एका भाषणात असदउद्दीन ओवैसी यांना उद्देशून “कहा से आये थे कहा चले जायेंगे, पता नही चलेगा” असे म्हटले होते. यावरुन नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे प्रमुख असदउद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या माधवी लता यांचा ३ लाख ३८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र नवनीत राणा याच्या वादग्रस्त वक्तव्याचे हे प्रकरण मात्र आता हैदराबाद न्यायालयात पोहोचले आहे. यापूर्वी नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबईतील न्यायालयात सुद्धा असाच एक खटला सुरू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या हनुमान चालिसा प्रकरणावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरणही त्यावेळी बरेच गाजले होते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वक्तव्ये केल्यावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवैसी यांनी या प्रचाराच्या काळात हिंदूंना उद्देशून काही वक्तव्ये केली होती. ओवेसी यांच्या १५ मिनिटांच्या भाषणाला आपले केवळ १५ सेंकदाचे भाषण पुरेसे असल्याचा दावा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. ही लढाई आता न्यायालयाची झाली आहे. हिंदूशेरणी नवनीत रवी राणा यांना वरील प्रकरणी हैदराबाद येथील न्यायालयाची दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याची नोटीस प्राप्त झाली आहे.