Shivsena women wing protested against Neelam Gorhe : विधानाचा निषेध; शिवसेना महिला आघाडी मैदानात
Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेत्या ॲड. जयश्री शेळके Jayashri Shelke यांनी केले.
निलम गोऱ्हे यांनी एका पदासाठी “दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या” असे वक्तव्य करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला. ॲड. जयश्री शेळके म्हणाल्या, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाला धोका देऊन काही नेत्यांनी गद्दारी केली. निलम गोऱ्हेही त्याच गद्दारांच्या मार्गावर चालल्या आहेत.”
१९९८ मध्ये निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी दिली. २००२ पासून आतापर्यंत ४ वेळा त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्याची संधी दिली. तसेच पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उपकरांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आजही त्या कार्यरत आहेत, असंही शेळके म्हणाल्या.
Chandraahekhar Bawankule: राज्यातील सर्वच जात पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष!
ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी निलम गोऱ्हे यांना अनेक पदे दिली, मानसन्मान दिला, पक्षात आणि समाजात ओळख मिळवून दिली. त्या पक्षाप्रती आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करुन त्यांनी निचपणाचा कळस गाठला आहे. निलम गोऱ्हे यांनी पक्षप्रमुखांनी केलेल्या उपकारांची परतफेड त्यांच्या निचपणाने केली असे ॲड.जयश्री शेळके म्हणाल्या.
अशा निचपणाचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाताई बढे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई खडसान, उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई बोधेकर, उपजिल्हाप्रमुख संजिवनी वाघ, लोणार तालुकाप्रमुख तारामती जायभाये, मेहकर तालुकाप्रमुख स्वातीताई नवले, सहसंघटक आरतीताई देशमुख यांची उपस्थिती होती.