Nitesh Rane : तो मदरसा बुलढाण्यात नाहीच, नितेश राणेंचा दावा चुकीचा!

Claim that Yemeni citizens are illegally residing in madrasas is false : मदरशात दहशतवाद्यांचा मुक्काम असल्याचे केले होते विधान

Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील एका मदरशात येमेनच्या दोन दहशतवाद्यांचा बेकायदेशीर मुक्काम असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र, त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मदरसा बुलढाणा जिल्ह्यात नसून नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

अक्कलकुवा येथील ‘जामीय इस्लामिया इसातूल उलूम’ या धार्मिक शिक्षण संस्थेच्या मदरशात येमेन देशातील दोन नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत होते. ही घटना फेब्रुवारी २०२५ मधील आहे. या पार्श्वभूमीवर गृहविभागाने एटीएसमार्फत चौकशी सुरू केली आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये ७२८ कोटी रुपयांची उलाढाल आढळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी ईडीकडे सोपवण्याची सूचना केली आहे, असं भोयर म्हणाले.

ladki bahin yojna : गाड्या बंगले असणाऱ्यांनी योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे !

या मुद्द्यावर अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्षवेधीही उपस्थित केली होती. त्यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आणि शिष्यवृत्तीत घोटाळा केल्याचा आरोप संस्थेवर केला आहे. येमेनमधून आलेल्या व्यक्तींचा व्हिसा २०१६ मध्येच संपला असतानाही ते मदरशात वास्तव्यास होते, ही माहितीही त्यांनी दिली.

jangli Rummy contrvarsi : जाहिराती स्कीप करत होतो, मात्र मला टार्गेट करण्यात आले

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व मदरशांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत कुठेही येमेनचे नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले नाही. मात्र, मंत्री नितेश राणे यांनी बुलढाण्याचा संदर्भ देत केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा अनावश्यकपणे चर्चेत आले, अशी खंत आता व्यक्त होत आहे.