condition of the protester on hunger strike deteriorated : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण, समर्थकांमध्ये चिंता
Akola राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसखोरी करून दिल्याचा आरोप करत अकोल्यात ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. जनार्दन हिरळकर, शंकर पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश ढोमणे आणि ऍड. भाऊसाहेब मेडशिकर हे पाच प्रतिनिधी उपोषणाला बसले आहेत.
तिसऱ्या दिवशी उपोषणकर्ते राजेश माणिकराव ढोमणे यांची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिल्यामुळे समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विविध संघटना व नेत्यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. यामध्ये रमेश वानखेडे, राम भारती, नंदू बोपुलवार, जगन्नाथ रोठे यांचा समावेश आहे.
या आंदोलनाद्वारे ओबीसी समाजातील अनेक जातींना धैर्य देत आरक्षण प्रश्नावर कायदेशीर लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. “आंदोलन सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केले आहे.