Ajit Pawars speech, laughter and applause : अजित पवारांचा टोला, भाषणात हशा आणि टाळ्यां
Phaltan : “ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नका!” असा थेट सल्लाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत विकासकामं, गावातील वाद, आणि काही विनोदी प्रसंग यावर भाष्य करत उपस्थितांना खळखळून हसवलं.
अजित पवार म्हणाले, “सरकारी विकासकामे करताना कॉन्ट्रॅक्टर चांगला असेल तर काम चांगले होते. पण कॉन्ट्रॅक्टर खराब असेल तर सरकारलाही त्रास होतो, कामं रेंगाळतात.” त्याच वेळी त्यांनी हसत हसत कटाक्ष टाकला “राजकारणात आलेले लोक कॉन्ट्रॅक्टर नकोत, आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनी राजकारणात येऊ नये, हा माझा कटाक्ष आहे!”
Reservation controversy : ओबीसी-मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला
यानंतर गावातील काही लोकांनी ग्रामपंचायतीतील वादांची तक्रार केली. यावर अजित पवार म्हणाले, “गावातला वाद हा गावातच थोरामोठ्यांनी बसून मिटवायचा असतो. मी तुम्हाला अमुक माणसाला निवडून आणा असं कधी सांगितलं का? मग आता पायताण घ्या आणि माझ्या डोक्यात टाका!” असं म्हणत त्यांनी सगळ्यांना हसवून टाकलं.
कार्यक्रमात अनेक मजेशीर क्षण घडले. एकाने सांगितलं, “दादा, तुम्ही आमच्या सरपंचाचं नाव घेतलं नाही!” यावर अजित पवार म्हणाले, “मी इथे नावं घ्यायला आलोय की काम करायला? मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही, उखाणे घ्यायला आलोय का मी?” असं म्हणत पवारांनी सभागृहात हशा पिकवला.
रस्त्यांबाबत चर्चा करताना एका नागरिकाने सूचना दिली “दादा, रस्त्यावरील डिव्हायडर मोठे करा, कुत्री उडी मारून येतात!” यावर अजितदादा म्हणाले, “मी कुत्र्यांना सांगतो, उडी मारू नका!”
फलटणमधील कर वसुलीवरही त्यांनी भाष्य केलं — “तुमच्या कंपन्या फक्त 20 लाखांचा टॅक्स देतात, वाढवा थोडा! बारामती ॲग्रो साडेतीन लाख देते, आता काळ बदललाय!” असं म्हणत त्यांनी स्थानिकांना आर्थिक शिस्तीचा सल्ला दिला.
यानंतर त्यांनी शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. “आमच्या शेतातून आधी 60-70 टन ऊस निघायचा, आता एआयमुळे तो 100 टनापर्यंत गेला. शेतकऱ्यांना 18 हजार रुपयांची मदत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिली जाते, लवकरच हे पैसे कृषी विभागाकडूनही मिळतील,” असं पवारांनी सांगितलं.
कार्यक्रमाच्या अखेरीस एक नागरिक म्हणाला, “दादा, फलटणला तुमच्या पदरात घ्या.” यावर पवारांचा मिश्कील टोमणा — “आता माझा पदर फाटलाय!”
तसेच महिलांच्या उत्पादनांसाठी 194 कोटींच्या मॉलचं काम मुंबईत सुरू असल्याचं सांगून पवार म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात 15 कोटींचे मॉल आणि तालुक्याच्या ठिकाणी देखील बाजारपेठ उभी राहणार आहे. आता मोटरसायकलवाल्यांनाही घर मिळणार!”
अजित पवारांच्या या भाषणात विनोद, विकास आणि राजकारण याचं भन्नाट मिश्रण पाहायला मिळालं आणि त्यामुळे ‘दादा’ पुन्हा चर्चेत आले आहेत!
_____