Prahar Janshakti Party : खड्ड्यात झोपून प्रहारचे आंदोलन, सरकारवर टीका

A protest by sleeping in potholes against the poor condition of the road : नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप

Malkapur शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून नवरात्रोत्सव तोंडावर असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाने अनोखे आंदोलन करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला.

जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली भारतकला रोडवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत झोपून ‘खड्ड्यात झोपून’ निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Waqf Amendment Act 2025 : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

 

अजय टप यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यावर पडलेले खड्डे नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात माता-भगिनी, लहान मुले मोठ्या देवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र खड्ड्यांमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी केवळ टक्केवारीवर कामे करत आहेत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. नगरपरिषदेकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कामे अडकली आहेत. जर तातडीने खड्डे बुजवले नाहीत, तर याहून अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि ‘भिक मांगो आंदोलन’ही करण्यास भाग पाडले जाईल.”

India Pak Match : भारत – पाक सामना फिक्सिंग होता !

नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा पर्दाफाश करण्यासाठी केलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले.

या प्रसंगी शहर प्रमुख शालीकराम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, संजय इंगळे, करण नायसे, नाना, सामाजिक कार्यकर्ते रवी वानखेडे, फुंदे यांच्यासह प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.