Breaking

Public Safety Act : जनसुरक्षा कायदा विरोधकांवर कारवाई करण्यासाठीच !

Nationalist Sharad Chandra Pawar party leader Anil Deshmukh attacks BJP government : ईडी कायद्याप्रमाणे या कायद्याचाही गैरवापर होणार

Nagpur : राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा विधानसभेत मंजूर केला. आता हा कायदा मंजुरीसाठी विधानपरिषदेत जाईल. यामुळे शेतकरी, कामगार, राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांच्यासुद्धा मनात भीती निर्माण झाली आहे. ईडीचा कायदा दहशतवाद्यांसाठी, ड्रग्जच्या विरोधात कारवाई करण्यासाठी होता. पण महाराष्ट्रात राजकीय विरोधकांवर कारवाई करण्याठी त्याचा वापर केला, तसा जनसुरक्षा कायद्याचा वापरही विरोधकांसाठीच करण्यात येईल, अशी भीती राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात आज (११ जुलै) नागपुरात पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, या कायद्यासंदर्भात अनेकांनी भीती व्यक्त केली, सभागृहामध्ये मते मांडली, उद्देश काहीही असला तरी राजकीय विरोधकांवर कारवाई या कायद्याद्वारे करण्यात येईल. परमबीर सिंग यांना सीबीआयने क्लीन चीट दिली. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांच्यावर उद्योजक, पोलिस खात्यातील लोकांनी आरोप केले होते. याची चौकशी करताना महाराष्ट्र पोलिसांनी प्रकरण सीबीआयला वर्ग केले. त्याचवेळी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होईल, असे वाटते होते. अन् झालेही तसेच. भाजप परमबीर सिंग यांना वाचवण्याचे काम करत आहे, असे ते म्हणाले.

Adulteration in milk : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्याची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या गटाला नोटीस देण्यात आल्या आहेत. पण नोटीस मिळाली नाही, असे श्रीकांत शिंदे सांगत आहे. शिंदेंचं नाव का घेतलं नाही, हे समजलं नाही. केवळ आमचाच पक्ष महाराष्ट्रात राहावा, असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे कोण कोणाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत देशमुख यांनी भाजपला टोला लगावला. अतिवृष्टीसंदर्भात विचारले असता शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोबतच लोकांच्या घरांचे, गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी मंजूर करून सरकारने दिलासा द्यावा, असे अनिल देशमुख म्हणाले.