RSS BJP : संघ दक्ष, बिहारकडे लक्ष!

RSS planning for Bihar election now : महाराष्ट्र, दिल्लीनंतर बिहारसाठी रणनीती

Nagpur दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता उलथवून टाकल्याने भाजपामध्ये प्रचंड उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या आक्रमक रणनीतीबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही या विजयात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर, संघाच्या स्वयंसेवकांनी दिल्लीत भाजपासाठी बॅकग्राऊंड तयार केले. आता संघ परिवाराचे पुढील लक्ष्य बिहार असल्याचे सांगितले जाते.

संघाकडून भाजपचे नाव न घेता सक्रिय प्रचार करण्यात येत नाही. मात्र जास्तीत जास्त मतदानाचे आवाहन करत असताना संकेतातून भाजपलाच मतदान करण्याचे अप्रत्यक्षपणे आवाहन करण्यात येते. महाराष्ट्रात हेच दिसून आले होते व भल्याभल्या राजकीय धुरणांचे अंदाज धुळीला मिळाले. संघाचे पदाधिकारी ‘ऑन रेकॉर्ड’ फक्त असे म्हणतात की, संघाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

Piyush Goyal : मनोहरभाई पटेल यांनी संस्कारक्षम पिढी घडवली

तथापि, संघाने केलेल्या छुप्या मेहनतीला कोणीही नाकारत नाही. महाराष्ट्राप्रमाणेच संघाने दिल्लीत १०० टक्के मतदानासाठी नागरिकांना प्रेरित केले. ‘बेहतर दिल्ली – बेहतर भारत’च्या टॅगलाइनने एक मोहीम सुरू केली. संघ स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन लोकांना मतदानासाठी प्रवृत्त केले. एका चांगल्या पक्षाला आणि चांगल्या उमेदवाराला संधी द्या, असे आवाहन करण्यात आले. यालाच ‘दिल्ली बचाओ अभियान’ असे नाव देण्यात होते.

स्वयंसेवकांनी या मोहिमेतील कोणत्याही पक्षाचे स्पष्ट नाव घेतले नाही. तथापि, साफसफाई, स्वच्छ पाणी, प्रदूषण, घुसखोरी, महिला सुरक्षा असे संवेदनशील मुद्दे नक्कीच उपस्थित केले गेले. लोकांना दिल्ली सुधारण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, स्वयंसेवक भाजपाच्या बूथवर वा मतमोजणीदरम्यान कोठेही दिसले नाहीत.

Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

संघाच्या दाव्यानुसार, मध्यमवर्गीयांत नाराजी असल्याची माहिती केंद्राला देण्यात आली होती. कदाचित याची दखल घेत केंद्र सरकारने आयकर सूटची मर्यादा १२ लाख रुपयांपर्यंत वाढवली. त्यामुळे दिल्लीचा मध्यम वर्ग भाजपाबरोबर उभा राहिला असल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसत आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आता बिहारबाबत नियोजन सुरू केले असून त्यासंदर्भात महत्त्वाच्या दोन बैठका झाल्यादेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.