Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मैदानात; ‘ ही तर सुरुवात…’

Protest march on farmers’ issues, warning to the government : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा, सरकारला इशारा

Nashik : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिला की “नाशिक ही फक्त सुरुवात आहे.”

पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. “गेल्या दोन महिन्यांत तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यात मराठवाडा आघाडीवर आहे. कर्जामुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, सरकारला जबाबदारी झटकून चालणार नाही,” असे ते म्हणाले.

Reservation control : बंजारा समाजाचा एल्गार, लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

आपल्या अनुभवांचा उल्लेख करताना पवार म्हणाले, “मी कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्यांवरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जिल्ह्यांना भेट देण्याची विनंती केली होती. आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळला जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेटलो. एका शेतकऱ्याच्या पत्नीने रडत सांगितलं की सावकार भांडी घेऊन गेला आणि शेतकऱ्याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपण हा मोठा रोग आहे, त्यावर उपाय करणे गरजेचं आहे. म्हणूनच 70 हजार कोटींची कर्जमाफी आम्ही केली होती,” असा उल्लेख त्यांनी केला.

Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !

पवारांच्या भाषणामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आले असून, आगामी काळात या आंदोलनाचा सूर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

____