MLA Sudhir Mungantiwars confidence in the grand camp at Mul : मुल येथील भव्य शिबिरात आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास
Chandrapur : देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मुल येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असून, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा एक नवा संदेश समाजात पोहोचेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतही ज्या सेवा उपलब्ध नाहीत, त्या सेवा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे. जिल्ह्यात अत्याधुनिक मेडिकल कॉलेज, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मुलमध्ये 100 बेडेड हॉस्पिटल, तसेच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, कृषी महाविद्यालय असे अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक उपजिल्हा रुग्णालये जमिनीअभावी रखडली असताना, महाराष्ट्रातील हे पहिले उपजिल्हा रुग्णालय आहे जे जमीन खरेदी करून उभारण्यात येत आहे. साधारणपणे उपजिल्हा रुग्णालयासाठी 8 हजार चौ.मी. बांधकामाला परवानगी असते; मात्र हा पहिला प्रयोग असून, यात तब्बल 15 हजार चौ.मी. मध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारले जात आहे.
Why raining : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? शेतकऱ्यांची अवस्था बिकट !
उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे जिल्हा रुग्णालयातर्फे आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बदलती जीवनशैली, अति खतांचा वापर आणि रासायनिक फवारणी यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. परिणामी किडनीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. या रुग्णांना चंद्रपूर-नागपूर येथे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी येत्या महिनाभरात मुल येथे ‘5 बेडचे डायलिसिस सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या आरोग्य शिबिरात साधारणपणे 3 ते 4 हजार भगिनींचे आरोग्याचे निदान करणार आहे. याशिवाय महिलांसाठी मोफत तपासणी, उपचार, पोषण आहार मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध सोयी सुविधांची तसेच आरोग्य शिबिराच्या व्यवस्थेची पाहणी केली
Local body election : निवडणूक खर्च मर्यादा ९ वर्षांपासून आहे तेवढीच !
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे, चंदू मारगोनवार,प्रवीण मोहूर्ले, नंदू रणदिवे, रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर, तहसीलदार मृदुला मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे, गटविकास अधिकारी अनिल चणफणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर सोनारकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बावणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लांडे आदींची उपस्थिती होती.