Sulbha Khodke : अमरावतीच्या विकासकामांसाठी निधी द्या

 

Provide funds for development works in Amravati : आमदार खोडके यांनी सभागृहात मांडला मुद्दा

Amravati अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत निधीची मागणी केली. अमृत २ योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा आणि भुयारी गटार प्रकल्पासाठी आवश्यक निधी त्वरित मंजूर करावा, अशी त्यांनी आग्रही मागणी केली. तसेच, उद्योग, सिंचन, पाणीपुरवठा आणि पर्यटन विकासासह पोलिस दलाच्या बळकटीकरणावरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता प्रकल्पांतर्गत अमृत २ योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा आणि भुयारी गटार प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. शहरातील जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती करून सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. गटार यंत्रणेतील अनियमितता दूर करून स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.

Harshwardhan Sapkal : सपकाळांच्या बाबतीत भाजपचे मौन का?

औद्योगिक आणि पर्यटन विकासांतर्गत औद्योगिक वसाहतींसाठी अधिक जमीन उपलब्ध करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत. सिंचन प्रकल्पांना गती देऊन शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा विकास करून पर्यटन वाढवण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, असं त्या म्हणाल्या.

शहर सुरक्षा आणि पोलिस यंत्रणेचे बळकटीकरणांतर्गत पोलीस वसाहतीसाठी स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून त्याच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करावा. पोलिस दलातील रिक्त जागा तातडीने भरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करावी. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी – गुन्हेगारी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

CM Devendra Fadnavis : धोत्रा नंदाईसह १४ गावांना पाणी मिळणार!

खोडके यांनी अमरावतीच्या नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार मूलभूत सुविधा सुधारण्याची गरज त्यांनी अधिवेशनात ठळकपणे मांडली. विशेषतः, पोलिस दलासाठी संसाधनवाढ आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.