Vijay Wadettiwar : एसआयटी नेमली म्हणजे कारवाई झाली असं नाही !

BJP government’s swift action in the Shalarth ID scam : शालार्थ आयडी घोटाळा १० हजार कोटींचा, राज्यभर व्याप्ती

Nagpur : शालार्थ आयडी घोटाळा महाराष्ट्रभर गाजतो आहे. शिक्षण खातं पूर्णपणे भ्रष्ट झालं आहे. हा घोटाळा १० हजार कोटींच्या घरात गेला आहे. संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने हजारो बोगस लोक शिक्षक म्हणून लावले आहेत. हा घोटाळा नागपुरात उघडकीस आला असला तरीही याची व्याप्ती नाशीक, छत्रपती संभाजीनगर आणि जवळपास राज्यभरच पसरली आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, थातुरमातूर कारवाई करून काही अधिकाऱ्यांना निलंबित करून आणि एसआयटी नेमली म्हणजे होत नाही. पात्र नसताना ४० – ४० लाख रुपये घेऊन शासनाची फसवणूक केली गेली आहे. या राज्यातील पात्र लोकांना बेरोजगार ठेवण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे थातुरमातूर कारवाई न करता या घोटाळ्यातील सर्वच जबाबदार लोकांना अटक झाली पाहिजे. ज्या संस्थाचालकांनी सुरुवातील तक्रार केली. त्यांनाच या लोकांनी अटक केली.

Devendra Fadanvis : सायबर फसवणूक झाली, काळजी करू नका; १०५ वर कॉल करा !

घोटाळे उघटकीस येऊ नये म्हणून ज्यांनी तक्रार केली, त्यांनाच अटक करण्याची भूमिका या सरकारची आहे. चोरी उघडकीस आणणाऱ्यांना आतमध्ये टाकण्याची सरकारची भूमिका आहे आणि हीच सरकारची ओळख बनली आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. पंढरपूर येथे पांडुरंगांच्या मंदिरात हींदी भाषेतून आरती करण्यात आली. यासंदर्भात विचारले असता, हा मराठी भाषीकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही तुमचं ऐकणार नाही, असाच संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न यातून दिसतो, असे ते म्हणाले.

Janakpurush Aandolan : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन

आमच्या भावनांचा आणि मराठी भाषेचा अपमान होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ हे प्रकार बंद केले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. शरद पवार यांच्यावर भाजपने केलेल्या टिकेवर प्रश्न विचारला असता, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यावर हे लोक टिका करत आहेत. ज्यांची औकात नाही, ते लोक पवारांवर टिका करत असल्याचे ते म्हणाले.