Vote theft case : आयोगाच्या सर्व्हरवर खासगी व्यक्तीचे नियंत्रण!

Raj Thackeray, Ajit Pawar face to face : राज ठाकरे, अजित पवार आमनेसामने

Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीत गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. मतदार यादीतील गैरसोयीची किंवा शंकास्पद नावं काही तासांतच गायब होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे, या बदलांबाबत निवडणूक आयोगालाच काहीच माहिती नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे “निवडणूक आयोगाचे सर्व्हर खासगी व्यक्ती चालवत आहेत का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित करत, “हा घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका,” अशी ठाम मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे “राज ठाकरे आता महाविकास आघाडीसोबत जाणार का?” असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली आणि सभागृहात हास्याचा माहोल निर्माण झाला.

market rally : सण, लग्नसराईत देशात 7 लाख कोटींची उलाढाल!

राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर आता स्वतः अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “कुणी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, पण मी काम करणारा माणूस आहे आणि मी काम करत राहीन.” त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, “शेतकऱ्यांसंदर्भात आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करतो, मला त्यात पडायचं नाही. मी उत्तर दिलं की, तुम्ही परत राज ठाकरेंकडे जाऊन विचारणार ‘अजित पवार असं म्हणाले’. त्यामुळे मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही.”

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत 31 लाख शेतकऱ्यांना बसू शकतो दणका !

दरम्यान, राज ठाकरे यांना पुन्हा विचारण्यात आलं की, “निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही महाविकास आघाडीसोबत दिसत आहात का?” त्यावर ते म्हणाले, “मी 2017 मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता प्रश्न असा आहे की निवडणूक कशी होणार, कोणा बरोबर होणार हे महत्त्वाचं नाही. 2017 मध्येही मी ह्याच विषयावर बोलत होतो. त्यावेळी काँग्रेसही होती आणि अजित पवारसुद्धा होते. खरं तर ते यायला हवे होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते आणि हेच मुद्दे मांडत होते.”

Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील या शब्दयुद्धाने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणूक आयोगावरील आरोप, मतदार यादीतील गोंधळ आणि आगामी स्थानिक निवडणुका या तिहेरी घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच गजबजलेलं दिसत आहे.

_____