Breaking

Yashomati Thakur : तिवसा नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम!

Congress continues to dominate in Tiosa Nagar Panchayat : यशोमती ठाकूर यांच्या गटाचा विजय; नगराध्यक्षपदी प्रतिभा गौरखेडे अविरोध

Amravati तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाच्या प्रतिभा गौरखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली. या विजयामुळे तिवसा नगरपंचायतीवरील काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले असून, यशोमती ठाकूर यांची राजकीय पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नियोजित वेळेनुसार सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. १९ सदस्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी केवळ प्रतिभा गौरखेडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी, तर सहायक पीठासन अधिकारी म्हणून शिवदास मुसळे यांनी काम पाहिले. तहसीलदार डॉ. मयूर कळसे, नायब तहसीलदार आशिष नागरे तसेच पोलिस बंदोबस्त तैनात होता.

Development Work Stopped : जिल्हा परिषदेला तीन वर्षांत ४५ कोटींचा आर्थिक फटका!

नगराध्यक्ष योगेश वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष प्रिया विघ्ने यांच्याकडे तात्पुरता प्रभार देण्यात आला होता. प्रतिभा गौरखेडे यांच्या निवडीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला डॉ. राजीव ठाकूर, मुकुंद देशमुख, सेतू देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, प्रणव गौरखेडे, दिवाकर भुरभुरे, प्रमोद वानखडे, पिंटू राऊत, अनिकेत देशमुख, नितीन मेहकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Health Department : गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाईचा फास!

या विजयामुळे काँग्रेस गटात जल्लोष साजरा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता अबाधित राहिली असून, पक्षाचे संघटन अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी हा विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.