Anti-Corruption Department : लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले !

Bribery revenue officials caught red-handed : मुरूमाची कायदेशीर वाहतूक करणाऱ्याला मागितली होती लाच

Yavatmal : सरळमार्गी व्यवसाय करणाऱ्यांना खाबुगिरी करणारे त्रास देतात आणि मग त्या त्रासामुळे लोक अवैध मार्गाकडे वळतात. कायदेशीररित्या मुरूमाची वाहतूक करणाऱ्याला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाच मागितली. पण या पठ्ठ्याने चुकीचा मार्ग न पत्करता सरळमार्गी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून चार महसूल कर्मचारी आणि एका मजुराला रंगेहात पकडून दिले. ही घटना गुरूवारी (२४ जुलै) यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा मार्गावरील बागवाडी बस थांब्याजवळ घडली.

मुरूमाची कायदेशीररित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून तो सोडण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यातील सात हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंघक विभागाने कर्मचाऱ्यांसह एका मजुराला अटक केली. जितेंद्र पांडूरंग ठाकरे (५७) मंडळ अधिकारी, महागाव कसबा, रा. नातूवाडी, दारव्हा, जय गणेश सोनोने (२६) ग्राम महसूल अधिकारी, हरू, रा. बापूजी नगर दारव्हा, पवन तानसेन भितकर (३०) ग्राम महसूल अधिकारी, पाळोदी, रा. अंबिका नगर, दारव्हा, नीलेश भास्कर तलवारे (३०), ग्राम महसूल अधिकारी, हातणी, रा. इंदिरा नगर, लाडखेड आणि अशोक श्रावण रणखांम (६०) मजूर, रा. हरू, ता. दारव्हा अशी लाच स्वीकारणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Liquor smuggling : मेघनादिदी लिहीलेल्या ट्रकमधून दारूची तस्करी !

तक्रारदाराचा मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे. २१ जुलै रोजी मुरूमाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पंचर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. या मार्गाने जात असलेल्या उपरोक्त कर्मचाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मरूम वाहतुकीच्या नियमानुसार सर्व पावत्या असल्याने कारवाई न करण्याची विनंती करूनही या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडून त्याच दिवशी १७ हजार रूपये नगदी घेवून ट्रॅक्टर जप्त केला. तो सोडविण्यासाठी उर्वरित २३ हजार रूपये देण्याची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे तक्रार दाखल केली.

Mahajan vs Khadse : गिरीश महाजन यांच्यामुळेच मुळेच मी भाजप सोडली

लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. उर्वरित २३ हजार रूपयांपैकी सात हजार ५०० रूपयांचा पहिला हप्ता घेण्यास कर्मचारी तयार झाले. त्यानुसार आरोपींपैकी मजूर असलेल्या खासगी व्यक्तीने काल गुरूवारी बागवाडी बसथांब्याजवळ ही रक्कम स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून आरोपींना रंगेहात पकडले व कायदेशीर कारवाईकरीता ताब्यात घेतले. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जून धनवट यांच्यासह पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अतूल मते, अब्दूल वसीम, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई, भागवत पाटील, सूरज मेश्राम, अतूल नागमोते यांनी केली.