Strong Protest in Buldhana Against the Attack on Chief Justice Gavai : सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा बुलढाण्यात तीव्र निषेध
Buldhana देशाच्या न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च पद असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत बुलढाणा जिल्हा वकील संघाने बुधवारी एकमताने ठराव पारित केला.
या ठरावाद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरू वकिलावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, न्यायव्यवस्थेवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांना शासनाने गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ठरावानंतर वकील संघाच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. ए. खांदे यांना निवेदन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष अॅड. विजय सावळे, सचिव अॅड. अमर इंगळे, अॅड. एन. बी. साखर, अॅड. राहुल दाभाडे यांच्यासह अनेक वरिष्ठ वकील, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) : सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे
“देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे न्यायव्यवस्थेवरील थेट आघात आहे. अशा घटना केवळ निंदनीय नाहीत, तर देशाच्या न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. सरकारने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा विचार करण्यात येईल,” असं निवेदनात म्हटलं आहे.
मुख्य न्यायमूर्तींविरोधात अशा घटनांमुळे न्यायालयीन यंत्रणेबाबत असलेला नागरिकांचा विश्वास ढळू शकतो, ही बाब देशासाठी चिंताजनक असल्याचे वकील संघाने नमूद केले.
Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी !
सभेत सर्व सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करत घटनेचा निषेध आणि कारवाईची मागणी नोंदवली. या वेळी संघाच्या बैठकीत देशभरातील वकील संघटनांनीही अशा घटनांविरोधात एकत्र यावे, असा प्रस्तावही मांडण्यात आला.